Dnyaneshwari Marathi Shala & Sanskar Varg
Our Mission
माऊली फाऊंडेशन च्या ज्ञानेश्वरी मराठी भाषा व संस्कार वर्गात आपले सर्वांचे स्वागत आहे. ज्ञानेश्वरी मराठी भाषा व संस्कार वर्ग हा केवळ मुलांना भारताशी जोडून ठेवणे व भारताबाहेरील पुढील पिढीमध्ये मराठी संस्कृती व भाषा टिकवून ठेवणे या हेतूने सुरू केला आहे.
आमचा उद्देश
अनिवासी भारतीय मुलांना मराठी शिकणे हा शालेय शिक्षणाचा भाग नाही. मराठीचे शिक्षण, संस्कृती व सभ्यता टिकविण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही हा उपक्रम कुठल्याही नफ्याची अपेक्षा न करता सुरू केला आहे.
आमचा उद्देश आहे की आपल्या अनिवासी भारतीय मराठी मुलांच्या मनात मराठी भाषा व संस्कृती टिकून राहावी. त्यासाठी त्यांना बोलणे वाचणे व लिहिणे याचे मोजमाप न करता ती ते सहज आत्मसात करतील याचा विचार करतो.
आपली समृद्ध असलेली संस्कृती आणि संस्कार हे मुलांच्या मनात रुजवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी आम्ही एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे. भाषा टिकवून ठेवण्यासाठी मुले ज्या पद्धतीचे शिक्षण भारताबाहेरील इतर भाषा शिकण्यासाठी घेतात त्याच पद्धतीचा वापर आम्ही मराठी शिकवितांना घेतो.
अधिक माहिती करता कृपया संपर्क साधावा.